आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .


डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...

जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !


आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .  

आवश्यक असेल तर याचा वापर करा . 

आपण सर्वच आता Google MAP वापरतो . त्याचा वापर ठिकाण शोधणे , प्रवासाचे अंतर मोजणे , किंवा  प्रवासाचा सोपा मार्ग शोधणे या करीता आपण करत असतो .

    या संबधी OLA , UBER  च्या मदतीने  प्रवास आपण केला असेल . या दरम्यान आपल्याला अनुभव आला असेल कि आपल्या निश्चित ठिकाणाची माहिती चालकाला मिळते  किंवा आपण बुक केलेली रिक्षा किंवा कार चे लोकेशन आपल्याला दिसत असते . किंवा  amazon किंवा  Post  Office   च्या मदतीने मागवलेले आपले पार्सल कुठं पर्यंत पोहचले आपल्याला बघता येते .

Google MAP  च्या मदतीने आज या दोन महत्वाच्या पर्यायांचा आज वापर करू 

१  तुम्ही कुठे आणि कोणत्या रस्त्यांनी  प्रवास केलात याचा तपशील बघू किंवा कसा सुरु करायचा ते बघू

 Google Map - Your  Timeline 


२  प्रवासात आपण कोणत्या ठिकाणापर्यंत  आहोत याची घरच्यांना काळजी असते त्या करीत लोकेशन शेअरिंग कायम स्वरूपी कसे सेट करायचे ते बघू .

 Google Map -   Location Sharing


 १   Goole  Map - Your  Timeline  ----------------

 मधील  सुरुवातीलाच डाव्या बाजूला असणाऱ्या तीन आडव्या  रेषा क्लिक करून आपण हा पर्याय वापरू शकतो . ज्या मध्ये काल  मी कोणत्या ठिकाणी प्रवास केलाय किंवा मागील दिवसात, महिन्यात किंवा अगदी वर्षभरात  केलेल्या  प्रवासाच्या नोंदी बघायला मिळतात .  जसे






वरच्या बाजूला Today पर्यायाचा वापर करून मागील नोंदी बघता येतात









हा पर्याय तुमच्या मोबाईल  दिसत नसेल आणि तो सुरु करायचा असेल तर पुढील पर्याय वापरा . 







वरील प्रमाणे पर्याय उपलब्ध असू शकतात ज्यातून  lets  go  किंवा  sign in या  पर्यायांचा वापर करून आपल्याला हि सुविधा सुरु करता येते .


या शिवाय मोबाईल ला  अजून एक परवानगी सुरु  करावी लागेल  किंवा द्यावी लागते ती खालील प्रमाणे .

बऱ्याच मोबाईल फोन मध्ये हा पर्याय off  असतो परंतु या  कामा साठी Location History हि ON  करावी लागेल.  


या नंतर आपण रोजच आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी  बघू शकाल अगदी तुमचा प्रवास हा कार ने झालाय कि बाईक ने हे सुद्धा कळू शकेल .







 2   Google  Map -  Location Sharing. -------------


Google Map -  Location Sharing या ऑपशन चा वापर करू


यामध्ये आपल्याला  लोकेशन शेअर करण्यासाठी लिंक पाठवता येते ती  आपण  ई मेल , टेक्स मेसेज किंवा व्हाट्सअँप  च्या मदतीने पाठवू शकतो . 


लोकेशन शेअर लिंक पाठवल्या नंतर - 



ज्या मोबाईल करीत आपण लिंक पाठवली आहे त्या मोबाईल मध्ये लिंक ला क्लिक केल्या वर ही स्क्रीन बघायला मिळेल


या मध्ये आपल्याला फक्त  share your location  या  पर्यायाला  on करावे लागेल .


वरील प्रमाणे आपल्याला ग्रुप लोकेशन बघायला मिळतील .

धन्यवाद . 

Comments

  1. The first playing software program was launched in 1994 by Microgaming. The first games that have been out there to play online have been Craps, Roulette, Video Poker 1xbet and Blackjack. It was not until 1998 when the first progressive jackpot known as ‘Cash Splash’ was launched.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?