करा ग्लोबल भाषांतर, वापरा ‘गुगल ट्रान्सलेटर’!

डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...

जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !



करा ग्लोबल  भाषांतर, 
वापरा ‘गुगल ट्रान्सलेटर’!


भाषांतर म्हणजे काय ? 


भाषा हे संवादाचे माध्यम आहे जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात, तसेच भारत हा देखील अनेक भाषा बोलणारा देश आहे अगदी दहा किलोमीटर अंतरा नंतर सुद्धा भाषेचा झालेला बदल आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे संवाद साधण्यासाठी आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी अनेक भाषांचं ज्ञान असणं ही गरज बनली आहे.

      जगाशी संवाद साधण्यासाठी आपल्याला जगाच्या भाषा समजावून घेणे आवश्यक आहे. याकरिता भाषांतर करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता भासते त्यांच्या मदतीने आपण ज्या लोकांच्या भाषा आपल्याला ज्ञात नाही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो.

  आपल्यासाठी हे काम गुगलने सोपे केले. याकरिता गुगल ट्रान्सलेटर या ॲपची निर्मिती गुगलने केली आणि भाषांतर करिता होणारा खर्च किंवा लागणारा वेळ हा कमी केला .

       त्यामुळे जगातल्या भाषांचे आकलन हे आपल्याला सोपे झाले त्याकरिता तज्ञांची मदत घेणे याची आवश्यकता राहिली नाही हे शक्य झाले. गुगल ट्रान्सलेटर त्यामुळे जगाची एकमेव भाषा ही आता गुगल ट्रान्सलेटर आहे असे म्हणायला हरकत नाही .

    मित्रांनो गुगल ट्रान्सलेटर हे एक बेस्ट लर्निंग टूल आहे असे मला वाटते. अभ्यासासाठी बऱ्याच वेळा आपण शब्दकोश किंवा डिक्शनरीचा वापर करतो त्यापेक्षा सर्वात सोपा पर्याय आपल्या मोबाईल मध्ये उपलब्ध आहे ज्याचा वापर करून आपण  शब्दांचे अर्थ किंवा वाक्याचा अर्थ किंवा अगदी पॅरेग्राफ नाहीतर संपूर्ण रिपोर्ट ला भाषांतरित करू शकतो.

     बऱ्याच वेळा आपल्याला पुस्तक, वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या लेखनाला बघून टाईप करायचे असते हे काम अवघड जाते तुम्ही फक्त त्याचा एक फोटो काढा आणि या अप्लिकेशन च्या मदतीने त्याला टेक्स्ट मध्ये रूपांतरित करा

विविध 108 भाषांमधील टाईप असलेल्या टेक्स्ट ला आपल्या मातृभाषेत कसे ट्रान्सलेट करायचे ते आपण बघू . याचा वापर करण्याकरीता ५००० अक्षरांची मर्यादा आहे हे ध्यानात असू द्या .

       गुगल च्या मदतीने १०८ भाषा जरी वापरता येत असल्या तरी आपण मराठी भाषे सोबत इंग्रजी असे उदहारण घेऊन हे समजावून घेऊ . 

आपण टाईप केलेल्या मराठी वाक्याला इंग्रजी मध्ये कसे ट्रान्सलेट करायचे ते बघू .
पुस्तकातील (छापील मजकुराला ) फोटोला टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करणे .
वाक्य टाईप न करता फक्त त्या टेक्स्ट वर कॅमेरा नेऊन लागलीच आपल्याला तो डेटा मराठी भाषेतच कसा बघता येईल .
मोबाईल वरच आपल्या हातांनी लिहलेल्या वाक्यांना टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करणे .
आपण मराठीमध्ये बोललेले वाक्य लगेच इंग्रजीमध्ये ( ट्रान्सलेट होईल) टाईप देखील होईल आणि बोलून देखील दाखवले जाईल .
मराठी भाषेमधून बोललेल्या संवादाला इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करून घ्या .



Google Translate हे अप्लिकेशन play store मधून इन्स्टॉल करून घ्या    . किंवा बाय डिफॉल्ट तुमच्या मोबाईल मध्ये असेल सुद्धा


ट्रान्सलेटर मध्ये इंग्रजी सोबत स्पॅनिश ही भाषा असते आपल्याला ती बदलून मराठी अशी करावी लागेल आणि त्याकरिता काही सिस्टीम फाइल्स डाऊनलोड होण्यासाठी थोडावेळ वाट बघावी लागेल.





१ आपण टाईप केलेल्या मराठी वाक्याला इंग्रजी मध्ये कसे ट्रान्सलेट करायचे ते बघू .
Tap to enter Text   याठिकाणी आपण टाईप केलेल्या इंग्रजी शब्दाला किंवा वाक्याला मराठीमध्ये अनुवादित केलेले बघायला मिळेल.


पुस्तकातील (छापील मजकुराला ) फोटोला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करणे .
वाक्य टाईप न करता फक्त त्या टेक्स्ट वर कॅमेरा नेऊन लागलीच आपल्याला तो डेटा मराठी भाषेत कसा बघता येईल .

चांगल्या स्पीड इंटरनेट असेल तर आपल्याला या कामात कुठलीही अडचण भासणार नाही.

ट्रान्सलेटर मधील सुरूवातीलाच दिसणारा कॅमेरा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्यालाआपला फोन इंग्रजी टेक्स असलेल्या फोटो ( पुस्तकाच्या ) समोर स्थीर असा पकडावा लागेल . आपण बघू शकाल पुस्तकातील इंग्रजी मधीलअक्षरे आपल्या मोबाईल मध्ये मराठी भाषेतन वाचता येईल अशी दिसत आहे .



पुस्तकातील (छापील मजकुराला ) फोटोला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करणे .

याचा सर्वात जास्त वापर होऊ शकतो .

ज्या पेजला आपल्याला ट्रान्सलेट करावयाचे आहे त्या पेजचा फोन कॅमेराच्या मदतीने एक फोटो काढून घ्यावा . आता गुगल ट्रान्सलेटर सुरू करून कॅमेरा या पर्यायाचा वापर करावा ज्यामध्ये सर्वात शेवटी असणाऱ्या तीन पर्यायांपैकी import चा वापर करूनआपण काढलेला फोटो सिलेक्ट करावा.
  आपल्या फोटोमधील सर्व टेक्स्ट जे इंग्रजीमधील आहे ते मराठी मध्ये ट्रान्सलेट करून इमेज फॉरमॅट च्या ऐवजी टेक्स्ट फॉरमॅट मधे बघायला मिळतील जे आपण -मेल करू शकतो किंवा कॉपी करून व्हाट्सअँप ला देखील वापरू शकतो .


मोबाईल वरच आपले हँड रायटिंग ला टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करणे .

प्रवासात कधी कीबोर्ड च्या मदतीने टाईप करणे शक्य होत नाही अशा वेळी आपण या हँड रायटिंग मोडचा वापर करून मेसेज टाईप करू शकतो आणि टाईप केलेल्याअक्षरांना मराठी किंवा इंग्रजी मध्ये भाषांतरित सुद्धा करू शकतो . या करीता सोबतच्या चित्रातील दुसऱ्या पर्यायाचा वापर करावा लागेल .


आपण मराठीमध्ये बोललेले वाक्य लगेच इंग्रजीमध्ये ( ट्रान्सलेट होईल) टाईप देखील होईल आणि बोलून देखील दाखवले जाईल . conversation पर्याय क्रमांक ३ मध्ये दिसणाऱ्या दोन माईक च्या चिन्हाचा वापर करून हे अनुभवता येईल.


आपण इंग्रजी ते मराठी किंवा मराठीचा इंग्रजी अशा दोन्ही पर्यायांचा वापर करू शकतो. मग आता आपले काम म्हणजे फक्त बोलणे .


    या मजेशीरऑपशन चा वापर करून आपण मराठी भाषेत बोललेल्या वाक्यांना इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून तर दिले जाईल तसेच त्यांचा उच्चार देखील करून दाखवला जाईल.  त्यामुळे एखादा मेसेज मराठीत टाईप करून त्याला इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी याचा छान वापर करता येईल .



उपयुक्त सूचना 

गुगल ट्रान्सलेटर चा वापर करण्यासाठी प्रत्येक वेळी मॅटर हा ट्रांसलेटर ॲप मध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता नाही जर आपण ट्रांसलेटर ॲप मधील सेटिंग या पर्यायाचा वापर करून " टॅप टू ट्रान्सलेट " हा मोड ऑन ठेवल्यास
मोबाईल मध्ये ईमेल किंवा व्हाट्सअँप किंवा टेक्स्ट मेसेज वाचत असताना तेथील इंग्रजी मॅटर ला सिलेक्ट केल्यानंतर कॉपी ऑपशन शेजारीच या ट्रान्सलेटर पर्याय ची लिंक उपलब्ध होते ( किंवा एक गूगल ट्रान्सलेटर चे छोटेशे चिन्ह /लोगो दिसून येते ) व आपल्याला त्या डेटा ला मराठीमध्ये वाचणे लगेच शक्य होते .

धन्यवाद   


Comments

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .