बोलत रहा , आपोआप टायपिंग होईल !




डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !


टायपिंग एक छान कौशल्य आहे. परंतु ज्यांना टायपिंगचे पुरेसे स्किल अवगत नाही त्यांना मोबाईल किंवा कॉम्पुटर वरती टायपिंग म्हणजे प्रचंड डोकेदुखी वाटू शकते. या करिता सर्वात सोपा पर्याय तो म्हणजे. " --- तुम्ही फक्त बोलत रहा, तो टाईप करत राहील.---" हा पर्याय गुगलने उपलब्ध करून दिलेला आहे तो कसा वापरायचा याविषयी आपण जाणून घेऊया.

आणि हो, फक्त मराठी नाही तर १२४ भाषा मधून टायपिंग तुम्ही करू शकाल तेही फक्त बोलून 

1 मोबाईल च्या मदतीने व्हॉइस टायपिंग
2 कम्प्युटर वरती व्हॉइस टायपिंग


1 मोबाईल मध्ये व्हाईस टायपिंग हे फीचर्स उपलब्ध असतेच , परंतु गूगल indic कीबोर्ड च्या मदतीने मराठी टायपिंगची सुविधा आपल्या मोबाईल वरती उपलब्ध करता येते. ( बहुतेक मोबाईल मध्ये हि सुविधा सुरुवाती पासूनच असू शकते )

मोबाईल च्या मदतीने व्हॉइस टायपिंग सुरु करण्या करीता आपल्या ला पुढील प्रमाणे काम करावे लागेल-


1 प्ले स्टोअर मधून गुगल इंडिक ( google Indic ) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे .



2 टायपिंगच्या कामाकरिता डिफॉल्ट किबोर्ड चेंज करून गुगल इंडिक कीबोर्ड सेट करावा. सोबत दिलेल्या चित्रातील बाणाच्या ठिकाणी क्लिक करून



3 पुढील प्रमाणे इंग्रजी व मराठी टायपिंग चा पर्याय आपल्या करिता उपलब्ध असेल या पद्धतीने मराठी टायपिंग करण्याचा अनुभव हा अत्यंत वेगळा असणार आहे.
google indic keyboard हा पर्याय निवड करा



4 फोन मध्ये मराठी टायपिंग कीबोर्ड च्या मदतीने हि सुविधा सुरु झाली असेल परंतु व्हॉइस मराठी टायपिंग सुरु करण्यासाठी सोबत दाखविलेल्या खालच्या बाजूच्या माईक ला क्लिक करावे





संपूर्ण यादी मधील फक्त मराठी हा पर्यायच ठेवावा बाकी ठिकाणी कुठेही टिक नसावी सर्व ठिकाणी चौकोनाच्या समोरची टिक ( चेक बॉक्स ) रिकामे ठेवावे .





5 आता समोर दोन माईक दिसत आहेत खालच्या बाजूच्या माईकला (टच करून ) टॅप टू स्पीक त्याचा वापर करून मराठीत टायपिंग चा आनंद घेता येईल ( या वेळी इंटरनेट सुरु असणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा )





६ आता व्हाट्सअँप , मेसेज , इमेल , फेसबुक इत्यादी ठिकाणी चॅटिंग साठी किंवा नोट्स तयार करणे , पुस्तक , कवीता किंवा प्रोजेक्त रिपोर्ट टायपिंग  साठी वापरा  तुमचा मोबाईल.


उद्याच्या भागात बघू कॉम्पुटर कीबोर्ड शिवाय बोलण्याच्या वेगाने टायपिंग 



मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा 



प्रा संदीप कोकाटे आणि  स्वप्नील कोकाटे   
संचालक,परफेक्ट कॉम्पुटरवणी  
9423969193 , 9420691297


अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇



Comments

  1. Multi wheel roulette online features as much as} 8 wheels spinning concurrently, along with your bets extending across all 8 wheels. The wheels observe the one "0" European roulette version 1xbet korea and every wheel spins independently, supplying you with multiple of} probabilities to win. All of the beneficial casinos here are are|listed below are} reliable sites that keep players safe. They respect playing rules and age restrictions, providing a superb actual money gaming experience in a secure surroundings dedicated to players' welfare and security online.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .