माहिती शोधा फोटो च्या मदतीने


डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...

जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !


माहिती शोधा फोटो च्या मदतीने 

मित्रानो आजच्या भागात आपण जाणूया कि माहिती शोधण्यासाठी "  सर्च वर्ड "  टाईप करण्याची आवश्यकता नाही तर त्याचा फोटो जरी असेल तरी त्या संदर्भात मिळती जुळती माहिती शॊधता येते . 

बऱ्याच वेळा असे पण होते कि रोज वापरण्याची वस्तू आहे पण तिचे नाव माहिती नाही जसे किचन मधले जिरे, हिंग, दगडफूल यांना काय म्हणायचे.
फोटो मधील शर्ट सारखा शर्ट, गॉगल ,घड्याळ , फोटो तील ड्रेस सारखा ड्रेस  शोधायचा आहे ,  फोटो मधील झाडाचे फुलाचे नाव किंवा तशीच काही फुल शोधायची आहे , किंवा त्याची माहिती शोधायची आहे .

कधी  फर्निचर , किंवा एखादी वस्तू , किंवा ठिकाणाचा आपल्याला शोध घ्यायचा असतो आणि आपल्याकडे फक्त फोटो उपलब्ध असतो याचा त्या वेळी वापर होऊ शकतो .

अगदी वस्तूची किंमत पण शोधायची आहे . हे आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर च्या मदतीने 


 अगदी सोपं आहे फक्त त्याचा एक फोटो काढा आणि या पर्यायांचा वापर करा

१  मोबाईल साठी  -    Google Lens.( बहुतांशी मोबाईल मध्ये हे इंस्टाल असेल )
२  कॉम्पुटर साठी -    https://www.google.com/imghp 

१ मोबाईल करीता -  फोटो गॅलरी मध्ये फोटो बघताना फोटो खाली दिलेले हे चिन्ह वापरून आपल्याला माहिती मिळवता येते . ( जसे या फोटो मधील झाडाची माहिती आपल्याला मिळू शकते )



जर गूगल लेन्स चे हे चिन्ह दिसत नसेल तर ( google  photo ) हे अप्लिकेशन इंस्टाल करावे लागेल . या  गुगल फोटो मध्ये फोटो बघताना हा पर्याय दिसून येतो .  


किंवा 

Google Lens  या अप्लिकेशन च्या मदतीने आपल्याला हि सुविधा सुरु करता येईल . 



२  कॉम्पुटर वर फोटो च्या मदतीने माहिती शोधण्या साठी (imgph)



या लिंक चा वापर करा किंवा  गूगल च्या मदतीने शोध  " search by image " आपल्या डेस्क टॉप वरील ब्राऊझर मध्ये पुढील प्रमाणे लिंक बघायला मिळेल . 

बऱ्याच वेळा फर्निचर , किंवा एखादी वस्तू , किंवा ठिकाणाचा आपल्याला शोध घ्यायचा असतो आणि आपल्याकडे फक्त फोटो उपलब्ध असतो याचा त्या वेळी वापर होऊ शकतो 


यातील कॅमेरा च्या चिन्हा चा वापर करून आपल्याला ज्याच्या विषयी माहिती शोध घेणे आहे तो फोटो अपलोड  करावा लागेल 
use an image  या पर्यायाचा वापर करा 

Choose  file मधून फोटो अपलोड करावा  इन्फॉरमेशन मिळे पर्यंत थोडा वेळ वाट बघावी लागेल 


या प्रकारे आपण फक्त फोटो च्या मदतीने मिळती जुळते फोटो किंवा त्या संबधी माहिती शोधू या 

धन्यवाद .

मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा 



प्रा संदीप कोकाटे आणि  स्वप्नील कोकाटे   
संचालक,परफेक्ट कॉम्पुटरवणी  
9423969193 , 9420691297


अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇


Comments

  1. Texas Hold’em Bonus Poker — Did you 더킹카지노 know that our Live Casino video games can even have progressive jackpots? Play this stay poker variant and be in with a chance to win real money when the First 5 Jackpot drops. Playing against an algorithm is one way have the ability to|you probably can} play your favourite desk video games online. If you are in search of a extra interactive expertise, you could need to try our Live Casino video games.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .