कॉम्पुटर च्या मदतीने व्हॉइस टायपिंग समजावून घेऊ 

डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...

जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !


बोलत रहा , आपोआप टायपिंग होईल !  भाग २ 


मागील भागात आपण मोबाईल च्या मदतीने टायपिंग बघितले, आज कॉम्पुटर च्या मदतीने व्हॉइस टायपिंग समजावून घेऊ

टायपिंग चे कौशल्य ज्यांचे कडे नाही त्यांना टायपिंग नुसत कंटाळवाणं  वाटू शकत . परंतु आता आनंदाने टायपिंग करा  आणि ते पण १२४ भाषण मध्ये . त्यात मराठी टायपिंग चा तुमचा वेग हा बोलण्याच्या वेगा इतका आपण करू शकतो अगदी काही मिनिटात .

 तुम्ही बोलायचे आणि तितक्याच वेगाने आणि १००%  अचूक टाईप करायचे संगणकाने . 

कॉम्युटर वरील व्हाईस टायपिंग करता तुम्हाला याची तपासणी करावी लागेल

इंटरनेटचे कनेक्शन एका प्रॉपर स्पीडने असायला हवे .
त्यासोबतच कॉम्प्युटरच्या मल्टिमीडिया सेटिंग म्हणजे माईक कंट्रोल ऑन असायला हवा
( माईक सुरु पाहिजे )


१ व्हॉइस टायपिंग चा वापर करण्यासाठी तुमचे G mail अकाउंट सुरु करा . ई-मेल अकाउंट ओपन करा. त्यामधील ॲप पर्यायचा वापर करून गुगल डॉक्स हे ॲप्लिकेशन सुरू करा.


२  उजव्या बाजूला वरती गुगल ऍप  चे या डॉस्ट  वर क्लिक करा


३  ओपन  होणाऱ्या यादीतून  Docs  या पर्यायाचा वापर करा



४ Google Docs चे खास वैशिष्ट्य म्हणजे टाईप केलेला डेटा सेव्ह करावा लागत नाही तर ऑटोमॅटिक तुमचे डॉक्युमेंट सेव्ह केले जाते.




५ गुगल डॉग्स हे ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर टूल्स मेनू मधून व्हाईस टायपिंग या पर्यायाची निवड करा.




६ शेजारी माईक च्या चिन्हावर ती क्लिक करून आपल्याला आवश्यक असलेल्या भाषेचा पर्याय निवड करा.




७ माईक च्या चिन्हावर क्लिक केल्या वर त्याचा आकार असा होईल . आणि आता तुम्ही बोला बोलत राहा आपोआप टाइप होत राहील.
 


८ बाय डिफॉल्ट इंग्रजी भाषा असते आपलायला English शेजारील बाणाला ( ड्रॉप डाऊन ) क्लिक करून मराठी हा पर्याय निवड करावा लागेल . आता मराठी त बोला तुमच्या बोलण्याच्या वेगाने बिनचूक मराठी टायपिंग चा आनंद घ्या.



धन्यवाद .


मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा 



प्रा संदीप कोकाटे आणि  स्वप्नील कोकाटे   
संचालक,परफेक्ट कॉम्पुटरवणी  
9423969193 , 9420691297


अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇

Comments

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .