मॉनिटर्स म्हणजे काय ?


डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !

मॉनिटर्स म्हणजे काय

 मॉनिटर्स  हे सर्वाधिक वापरले जाणारे आउटपुट डिव्हाईस आहे . कंप्यूटर ने केलेल्या कामाचे रिझल्ट हे  मॉनिटर वरतीच बघायला मिळत असतात . मॉनिटर वरती दिसणाऱ्या आउटपुट ला सॉफ्टकॉपी असे म्हणतात. मॉनिटरचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याचे स्पष्टता. 

      स्पष्टता मोजण्यासाठी रिझोल्युशन या मापकाचा वापर केला जातो. रिझोल्युशन सांगण्यासाठी पिक्सेल म्हणजे बिंदूंच्या संख्या विषयी स्पष्टता दिली जाते. थोडक्यात मॉनिटर ची स्क्रीन ही छोट्या-छोट्या बिंदूंची मिळून बनलेली असते. त्या प्रत्येक छोट्या बिंदूला पिक्सेल असे म्हटले जाते आणि जितके पिक्सेल जास्त तितकी मॉनिटरची स्पष्टता जास्त असते .

 मॉनिटर चा आकार हा कर्ना मध्ये मोजला जातो .म्हणजे ( वर दिलेल्या चित्रा नुसार ) स्क्रीन वरील तिरप्या रेषेतली लांबी

डॉट पीच  :- मॉनिटर ची स्क्रीन ज्या बिंदू पासून बनलेले असते त्या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे  डॉट पीच असे  असते स्पष्टता मोजण्यासाठी दोन बिंदूंमधील अंतर देखील कमी असावे हे महत्त्वाचे असते .

मॉनिटर चे प्रकार पुढीलप्रमाणे-

1  एलसीडी मॉनिटर
2  सीआरटी मॉनिटर
3  कर्व्हड  मॉनिटर 
4  बुक्स
5  प्रोजेक्टर
6  डिजिटल / इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड
7  अल्ट्रा हाय डेफिनेशन टेलिव्हिजन 

उद्याच्या भागात सीपीयु विषयी समजावून घेऊ 

मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा 




प्रा संदीप कोकाटे आणि  स्वप्नील कोकाटे   
संचालक,परफेक्ट कॉम्पुटर, वणी  
9423969193 , 9420691297


अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇
http://superperfect.org

Comments

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .