करा ग्लोबल भाषांतर, वापरा ‘गुगल ट्रान्सलेटर’!

डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! करा ग्लोबल भाषांतर, वापरा ‘गुगल ट्रान्सलेटर’! भाषांतर म्हणजे काय ? भाषा हे संवादाचे माध्यम आहे जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात, तसेच भारत हा देखील अनेक भाषा बोलणारा देश आहे अगदी दहा किलोमीटर अंतरा नंतर सुद्धा भाषेचा झालेला बदल आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे संवाद साधण्यासाठी आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी अनेक भाषांचं ज्ञान असणं ही गरज बनली आहे. जगाशी संवाद साधण्यासाठी आपल्याला जगाच्या भाषा समजावून घेणे आवश्यक आहे. याकरिता भाषांतर करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता भासते त्यांच्या मदतीने आपण ज्या लोकांच्या भाषा आपल्याला ज्ञात नाही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. आपल्यासाठी हे काम गुगलने सोपे केले. याकरिता गुगल ट्रान्सलेटर या ॲपची निर्मिती गुगलने केली आणि भाषांतर करिता होणारा खर्च किंवा लागणारा वेळ हा कमी केला . त्यामुळे जगातल्या भाषांचे आकलन हे आपल्याला ...