बोलत रहा , आपोआप टायपिंग होईल !
डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! टायपिंग एक छान कौशल्य आहे. परंतु ज्यांना टायपिंगचे पुरेसे स्किल अवगत नाही त्यांना मोबाईल किंवा कॉम्पुटर वरती टायपिंग म्हणजे प्रचंड डोकेदुखी वाटू शकते. या करिता सर्वात सोपा पर्याय तो म्हणजे. " --- तुम्ही फक्त बोलत रहा, तो टाईप करत राहील.---" हा पर्याय गुगलने उपलब्ध करून दिलेला आहे तो कसा वापरायचा याविषयी आपण जाणून घेऊया. आणि हो, फक्त मराठी नाही तर १२४ भाषा मधून टायपिंग तुम्ही करू शकाल तेही फक्त बोलून 1 मोबाईल च्या मदतीने व्हॉइस टायपिंग 2 कम्प्युटर वरती व्हॉइस टायपिंग 1 मोबाईल मध्ये व्हाईस टायपिंग हे फीचर्स उपलब्ध असतेच , परंतु गूगल indic कीबोर्ड च्या मदतीने मराठी टायपिंगची सुविधा आपल्या मोबाईल वरती उपलब्ध करता येते. ( बहुतेक मोबाईल मध्ये हि सुविधा सुरुवाती पासूनच असू शकते ) मोबाईल च्या मदतीने व्हॉइस टायपिंग सुरु करण्या करीता आपल्या ला पुढील प्रमाणे काम करावे लागेल- 1 प्ले स्टोअर मधून गुगल इंडिक ( google Indic ) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे . ...