CPU म्हणजे काय या संदर्भात


डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार...
जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर !


CPU  म्हणजे काय बाबत जाणूया 

हा कॉम्पुटर चा सर्वात महत्वाचा भाग असतो . कॉम्पुटर ची ओळख हा मॉनिटर , कीबोर्ड,  माउस इत्यादी नसून या सर्वांसोबत सुसंवाद घडवून आणणारा CPU असतो . वेग आणि क्षमता हि यावरच ठरत असते. म्हणून कॉम्पुटर विकत घेताना सुरुवातीला याचाच विचार केला जातो .

कॉम्पुटर विकत घेताना ? 

 तो   आपल्याला काय कामाने वापरायचा आहे त्याची यादी सुरुवातीला करायला पाहिजे मग त्या यादी नुसार कोणते कॉन्फिरिगेशन आवश्यक आहे त्यानुसार निवड केली जाते . आपल्या कामाच्या स्वरूपानुसार कोणती अप्लिकेशन / प्रोग्रॅम ची आवश्यकता आहे याची निवड हि तुमचा CPU ची निवड असते .

पर्सनल कॉम्पुटर चे आतील भागामध्ये मोजकेच इलेकट्रॉनिक सर्किट असतात त्या प्रत्येकाची ओळख आणि वैशिष्ट्ये ( म्हणजे ते कसे काम करतात ) समजावून घेतल कि मग आत्मविश्वासाने कॉम्पुटर खरेदी किंवा अपग्रेड चे निर्णय तुम्ही घेऊ शकतात .

आपण CPU आणि त्याच्या आतील भागांची सविस्तर ओळख करून घेऊ

१  कॅबिनेट -                 CPU बाहेरील कव्हर ला म्हणतात

२  SMPS -                   हा पॉवर सप्लाय चे काम करतो ( switch mode power supply )

३  सिस्टीम बोर्ड -          हा सर्व भागांना एकत्रित पणे बांधून ठेवतो म्हणून याला मदरबोर्ड असे पण म्हणतात

४  मायक्रोप्रोसेसर -      हा संगणकाचा मेंदू असतो  आणि यावरच पूर्ण संगणकाचा वेग आणि इतर कामे होतात

५  मेमरी -                    सर्व डेटा रेकॉर्ड करण्याचे काम तसेच CPU ला कामात मदत करणे हि कामे

६  एक्स्पान्शन कार्ड्स - संगणकाच्या आहे त्या क्षमते मध्ये वाढ करण्यासाठी यांचा वापर केला जातो

७  पोर्ट्स -                   म्हणजे CPU ला जोडणी करण्याची ठिकाणे असतात

८  केबल-                    आतील तसेच बाहेरील सर्व भागांना CPU ला जोडण्यासाठी या महत्वाचे कार्य करतात 

९ बस लाईन्स -          मदरबोर्ड किंवा इतर सर्व इलेकट्रॉनिक भागात डेटा वाहून नेण्याचे रस्ते म्हणजे बसलाईन


उद्याच्या भागात माहिती घेऊ इन्फॉर्मशन टेक्नॉलाजी विषयी  

मागील भागातील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा 



प्रा संदीप कोकाटे आणि  स्वप्नील कोकाटे   
संचालक,परफेक्ट कॉम्पुटरवणी  
9423969193 , 9420691297


अधिक माहितीसाठी भेट द्या 
👇

Comments

Popular posts from this blog

बूटिंग म्हणजे काय ते जाणा

मॉनिटर्स म्हणजे काय ?

आपल्या सर्व प्रवासाच्या नोंदी असतात आपल्या मोबाईल कडे .