ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय हे जाणा.

डिजिटल इंडियाचे स्वप्न होईल साकार... जेव्हा प्रत्येक व्यक्ती असेल संगणक साक्षर ! ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय हे जाणा. कॉम्पुटर इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे त्याला सुरू करण्यासाठी किंवा वापरणे योग्य असा बनवण्यासाठी जो प्रोग्राम काम करतो त्याला ऑपरेटिंग सिस्टिम असे म्हणतात . OS ( ऑपरेटिंग सिस्टीम ) जे संगणकाच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवतात आणि वापरकर्त्याला म्हणजे युजरला संगणकाच्या वापराची सुलभता देतात . थोडक्यात पडद्यामागून संगणकाची सर्व कामे हाताळण्याचे महत्त्वाचे कार्य ही ऑपरेटिंग सिस्टिम करत असते. जसे फाईलचे व्यवस्थापन करणे प्रोग्राम सुरू करणे, संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करणे, आणि इतर डिव्हायसेस चा संगणका सोबत सुसंवाद घडवून आणणे. उदाहरण जर तुमच्या कारमधून इंजिन काढले तर कार चालेल काय? नाही ना . तसेच कम्प्युटरमधून ऑपरेटिंग सिस्टिम काढून टाकली तर तुमचा कम्प्युटर हा चालू शकणार नाही. विंडोज ,मॅक ओएस लिनक्स आणि अँपल या जगप्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टिम आहेत. उद्याच्या भा...